Amravati Fake Seeds : अमरावतीत 4 लाखांची बोगस बियाणं जप्त, कृषी खातं - गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
Continues below advertisement
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला सध्या बोगस बियाणांचा मोठा धोका निर्माण झाला आहे.. शनिवारी रात्री अमरावती जिल्ह्यात बोगस बियाणांची विक्री करताना एकाला रंगेहात पकडण्यात आलं. कृषी विभाग आणि पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही संयुक्त कारवाई केली. एक एजंट गावोगावी फिरून बोगस बियाणं विकतोय अशी टीप कृषी खात्याला मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आरोपी अशोक भाटेकडून ४ लाखांच्या बोगस बियाणांसह एकूण ९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Continues below advertisement