Amravati Clashes : अमरावतीत कमानीच्या वादावरुन राडा, आंदोलनकर्त्यांकडून दगडफेक ABP Majha

Continues below advertisement

अमरावती: महापुरुषांच्या नावाची कमान उभारण्यावरुन निर्माण झालेला वाद चिघळल्यामुळे सोमवारी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तुफान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गावकऱ्यांचे शिष्टमंडळ, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांची बैठक सुरु होती. गेल्या तीन दिवसांपासून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. परंतु, तीन दिवस उलटूनही तोडगा न निघाल्यामुळे पांढरी खानमपूर गावातील एका गटाचा संयम सुटला आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लाठीमार करुन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, आक्रमक असलेले आंदोलक आणखीनच बिथरले आणि त्यांनी तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. या आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलकांवर पाण्याच्या फवाऱ्याने मारा केला. मात्र, आंदोलक अजूनही आक्रमक मनस्थितीत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram