Amravati:बौद्ध बांधवांचं तीन दिवसांपासून आंदोलन,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमानीसाठी आंदोलन
Amravati:बौद्ध बांधवांचं तीन दिवसांपासून आंदोलन,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमानीसाठी आंदोलन
अमरावतीत गेल्या तीन दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बौद्ध बांधवांकडून ठिय्या आंदोलन करण्यात येतंय. या आंदोलनकर्त्यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जोपर्यंत लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, अशी भूमिका बौद्ध बांधवांनी घेतलीय. काही दिवसांपूर्वी पांढरी खानमपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान लावण्यावरुन
दोन गट आमने सामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमानीसाठी बौद्ध बांधवांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या दिलाय.