Amravati : Devendra Bhuyar यांची नार्को टेस्ट करा, वरुडमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं उपोषण
Continues below advertisement
Amravati : Devendra Bhuyar यांची नार्को टेस्ट करा, वरुडमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं उपोषण
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा या मागणीसाठी अमरावतीतल्या वरुडमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं उपोषण सुरू आहे. विधानसभा प्रचारादरम्यान 19 ऑक्टोबर 2019ला देवेंद्र भुयार यांचं वाहन अडवून सहा अज्ञातांनी तीन गोळ्या झाडल्या आणि वाहनाची जाळपोळ केली अशी तक्रार देवेंद्र भुयार यांचे ड्रायव्हर आकाश नागापुरे यांनी शेंदूरजना घाट पोलीस ठाण्यात केली होती. मात्र अद्याप त्या 6 अज्ञातांचा आणि त्या वाहनाचा शोध लागला नाही. अखेर 10 डिसेंबर 2020ला पोलिसांनी हे प्रकरण कायमस्वरूपी तपासात ठेवून क्लोझर रिपोर्ट दिला. त्यामुळे नेमकं कोणतं वाहन जाळलं आणि गोळ्या खरंच झाडण्यात आल्या होत्या ता असा मुद्दा उपस्थित करत वरुडमधील सर्वपक्षीय पदाधिकारी आक्रमक झालेत.
Continues below advertisement