Amitabh Bachchan on Trollers तुला माहितीये का तुझा बाप कोण?ट्रोलरच्या पोस्टवर संतापले अमिताभ बच्चन
Continues below advertisement
'मी आशा व्यक्त करतो की तुम्ही या कोव्हिडने मराल!' या ब्लॉगरच्या टिप्पणीवर अमिताभ बच्चन संतापले. त्याचा आपल्या योग्य शब्दात त्यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणतात, ते मला असं सांगतात, की मी आशा करतो की तुम्ही या कोव्हिडने मराल. अरे निनाव्या ट्रोलर. तू साधं तुझ्या वडिलांचं नावही लिहिलेलं नाहीस. कारण, तुला तुझे वडिल कोण आहेत हेच माहीत नाही. आता केवळ दोन गोष्टी होतील. एकतर मी मरेन. नाहीतर मी जिवंत राहीन. जर मी मेलो, तर तुला तुझ्या मनासारखं लिहिता येणार नाही. त्यानंतर तुझ्या लिखाणावर कोणी लक्षही देणार नाही कारण त्यावेळी अमिताभ बच्चन हयात नसतील. आणि जर मी जिवंत राहिलो, तर मात्र तुम्हाला 90 मिलीयन लोकांशी सामना करावा लागेल.
Continues below advertisement
Tags :
Amitabh On Troller Amitabh In Hospital Amitabh Corona Amitabh Covid Corona Positive Amitabh Bachchan