Amitha Bacchan : रस्त्याच्या कामात बिग बींच्या भिंतीचा अडथळा : Abp Majha

Continues below advertisement

अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या मुंबईत असलेल्या जुहू चौपाटी परिसरामधील प्रतीक्षा बंगल्याची (Pratiksha Bungalow) भिंत मागील काही वर्षांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. रस्ते रुंदीकरणासाठी बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत मोठी अडसर ठरत असल्याचे समोर आले होते. ज्यानंतर लोकायुक्तांनी याबाबत मुंबई महापालिकेला स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर पालिकेने प्रतीक्षा बंगल्यावर तूर्तास कारवाई करणार नाही असं स्पष्टीकरण लोकायुक्तांच्या सुनावणीत दिली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी ठेकेदार मिळत नसल्याने प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीवर कारवाई केली नसल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे. तसंच पुढील आर्थिक वर्षात कंपाउंड वॉल पाडून पुढची कार्यवाही करु असं पालिकेनं म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram