MahaShivratri | अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा महासागर
Continues below advertisement
अंबरनाथचं शिवमंदिर हे तब्बल ९६० वर्ष जुनं असून हे हेमांडपंथी मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानलं जातं. युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारशांच्या यादीतही या मंदिराचा समावेश आहे. त्यामुळे या मंदिराला अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यामुळेच महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी इथे ४ ते ५ लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. रात्री १२ वाजता मंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील परिवाराने पूजा केल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं, मात्र यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आलेला नाहीये
Continues below advertisement