Amaravati | प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या; हत्येनंतर तरूणाकडून आत्महत्येचा प्रयत्न | ABP Majha
प्रेमप्रकरणातून एका तरुणाने महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने विद्यार्थीनीला चाकूने भोसकले आणि त्यानंतर तोच चाकू स्वतःच्या पोटात भोसकला. यामध्ये विद्यार्थीनी जागीच ठार झाली आहे, तर हल्लेखोर तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर धामणगावनजीकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.