दिल्लीतल्या स्फोटानंतर मुंबईत अलर्ट, नरिमन हाऊसबाहेर सशस्त्र पोलीस बंदोबस्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jan 2021 11:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : नवी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला आहे. या ब्लास्टमुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम घटनास्थळी पोहोचली आहे. दिल्लीचे पोलिस कमिशनर एसएन श्रीवास्तव म्हणाले, राजेश पायसट मार्क येथे हा स्फोट झाला आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून इस्त्रायली दूतावास 150 मीटर अंतरावर आहे. दरम्यान या स्फोटाच्या घटनेनंतर मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट केलं असून त्यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.