Pandharpur अल्कोहोलयुक्त असल्याने विठ्ठलाच्या पायावर सॅनिटायझर फवारण्यास वारकऱ्याचा विरोध | पंढरपूर

Continues below advertisement

राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत आता सर्व स्तरातून आवाज उठू लागला असताना जर राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडले तर विठुरायाच्या पायावरील दर्शन काही दिवस बंद ठेवले तरी चालेल मात्र देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध आहे. विठ्ठल मंदिर सुरु करण्यासाठी विश्व वारकरी सेना वंचितच्या मदतीने १ लाख वारकरी घेऊन विठ्ठल मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. भाजपने उद्या राज्यभर घंटानाद आंदोलन पुकारले आहे तर सर्वच पक्षातील राजकीय नेते मंदिर उघडण्याबाबत आता आक्रमक होऊ लागले असताना याबाबतचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. इतर मंदिराच्या तुलनेने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पायावर दर्शन असल्याने याबाबत वेगळा प्रश्न उभा राहणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram