Akola Voilence : अकोल्यातील संचारबंदी कधी हटणार? दैनंदिन व्यवहार करण्यासाठी नागरिकांना सूट
शनिवारी रात्री अकोल्यातील हरिहरपेठमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर रविवारपासून अकोला शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती... सध्या संचारबंदी काही ठराविक काळासाठी शिथिल करण्यात आली आहे... दंगलग्रस्त भागातील संचारबंदीला सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे.. मात्र रात्रीच्या सुमारास जमावबंदी आणि संचारबंदी लागू ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.. तसेच नागरिकांना दैनंदिन व्यवहारांसाठीदेखील प्रशासनाने सुट दिली आहे... सध्या अकोल्यातील वातावरण निवळलं असलं तरी संचारबंदी पूर्णपणे कधी हटणार याकडे लक्ष लागलंय..