Akola : अकोला आणि अकोटला जोडणाऱ्या पुलाची उंची ५ फूट, पावसाळ्यात पूल पाण्यात जाणार
अकोला जिल्ह्यात सध्या एका रपट्यावजा पुलाची चांगलीच चर्चा सुरू आहे. अकोला आणि अकोटला जोडणारा हा पूल आहे. अकोला आणि अकोटला जोडणाऱ्या ब्रिटीशकालीन पुलाला सहा महिन्यांपूर्वी तडे गेले. यामुळे हा पूल बंद करण्यात आला.. मात्र यामुळे अकोटच्या रहिवाशांचे प्रचंड हाल होऊ लागले. म्हणून प्रशासनानं नवा पूल बांधायला घेतला.. यासाठी ४ कोटी रुपये खर्च करण्यात आले.. पण हा पूल केवळ पाऊस सुरू होईपर्यंतच उपयोगी पडणार आहे.. कारण त्याची उंची आहे केवळ ५ फूट. गांधीग्रामला येथील पुर्णा नदीच्या पहिल्याच पुरात हा पुल पाण्याखाली जाणार आहे, अशी तक्रार स्थानिक करतायत.