Akolha Bhang : अकोल्यात चॉकलेटच्या रॅपरमधून चक्क भांग विक्री

अकोल्यात भांग विक्रीचा एक अजबच प्रकार समोर आलाय.. चक्क चॉकलेटच्या रॅपरमधून भांग विक्री होत असल्याचं समोर आलंय. समाजसेवक विनय सरनाईक यांच्या निदर्शनास हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी हा सगळा प्रकार उघकीस आणला. सरनाईक हे न्यायालयीन कामानिमित्त अकोला न्यायालयात जात असताना लहान शाळकरी मुलांच्या हातात हे चॉकलेट दिसले, ते वेगळे चॉकलेट थोडा आगळंवेगळं असल्याने चॉकलेटची तपासणी केली. त्यात चक्क शाळकरी मुलांच्या चॉकलेट रॅपरमध्ये भांग दिसून आली. हा सगळा प्रकार अतिशय धक्कादायक असून याकडे संबंधित विभागानं तसेच पोलीस प्रशासनानं लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola