Nitin Deshmukh : पाणी प्रश्नावरुन नितीन देशमुख आक्रमक, फडणवीसांच्या घरापर्यंत काढणार पदयात्रा
बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख मतदारसंघातील पाणी प्रश्नावरुन पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत...पाणी प्रश्नावरुन आजपासून 21 एप्रिल पर्यंत अकोला ते नागपूर पदयात्रा काढण्यात येणार आहे. अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरापासून या यात्रेला सुरूवात होणार आहे... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरापर्यंत ही पदयात्रा काढण्यात येईल . दररोज सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात ही यात्रा काढण्यात येणार आहे...