Nitin Deshmukh : नितीन देशमुखांच्या भाषणात तरुणाचा गोंधळ, कापसाचा मुद्यावर आक्रमक
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे भाषण सुरू असतानाच एक तरुण उठला अन् बोलू लागलाय. तितक्यात आमदारांच्या समर्थकांनी त्याला ओढून बाहेर हाकालून लावण्याचा प्रयत्न केलाय. पण देशमुखांनी थेट तरुणाला स्टेजवर बोलावलं, अन् माईकवर बोलायला सांगितलं. या तरुण शेतकऱ्यांनं कापसाच्या भाव वाढीवर प्रश्न उपस्थित केले, सुरुवातीला सहा हजारानं कापूस विकावा लागला, आता कापूस 8,300 कसा पोहोचला. हा संपूर्ण प्रकार अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांच्या शेतकरी संघर्ष पदयात्रेचा समारोप दरम्यान आयोजित सभेत घडलाय.