Nana Patole on Rahul Shewale : राहुल शेवाळे यांच्या टीकेला नाना पटोले यांचं सडेतोड उत्तर
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा अकोल्यात पोहोचली आहे आणि यात्रा रोखण्याची मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केल्यानंतर या यात्रेवरून राजकारण तापलंय. या पार्श्वभूमीवर आज दुपारी दोन वाजता अकोल्यात राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होणार आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केल्यानं शिंदे गट आणि भाजपनं त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यात्रा महाराष्ट्रात असताना हा वाद सुरु असल्यानं आज राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.