Lockdown Again? अकोला, अमरावती आणि यवतमाळ शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार
Continues below advertisement
विदर्भातल्या अकोला, अमरावती आणि यवतमाळ या तीन शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा विचार आहे. कारण या तिन्ही शहरांमधील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागल्यानं जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीदेखील राज्यातील कोरोना स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अकोला, अमरावती आणि यवताळ या तीन शहरांमधील कोरोना स्थितीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतंय.
Continues below advertisement