Akola : अकोला MIDCमध्ये कृषिमंत्र्यांच्या नावावर कृषी विभागाच्या 'कथित' पथकाची धाड ABP Majha

अकोल्यात कृषीमंत्र्यांच्या नावावर कृषी विभागाच्या कथित पथकानं अकोल्यातील एमआयडीसीमध्ये धाडी कालपासून धाडी टाकल्यायेत. मात्र, या पथकात अधिकार नसलेल्या अनेक खाजगी व्यक्तींचा समावेश असल्याची बाब समोर आलीये. या पथकानं पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकानं केलाय. दरम्यान, पथकात कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक दिपक गवळी आणि वादग्रस्त असलेल्या हितेश भट्टड यांच्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झालेयेत. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी यावरून अब्दूल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केलेयेत. हे सारं पथक आणि पथकाची धाड एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यात टिपल्या गेलीये. 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola