Amit Shaha Rally Akola : अकोल्यात आज केंद्रीय मंत्री अमित शाहांची सभा, जोरदार पावसाची हजेरी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोठमोठ्या नेत्यांकडून प्रचार सभा घेण्यात येत आहेत.. आज अकोल्यावर अनुप धोत्रेंच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची सभा पार पडणार आहे..दुपारी ३ वाजता सुरू होणारी अमित शाहांची सभा पावसामुळे थोड्या उशिरानं सुरु होणार असल्याचं समजतंय.. सभेसाठी कार्यकर्तेही जमण्यास सुरुवात झालेय.. तर बुलढाण्यात प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजितदादांची प्रचार सभा होणार आहे.. मात्र बुलढाण्यातील खामगाव, शेगाव परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्याने, प्रचारसभेवर पावसाचं सावट दिसतंय.. अवकाळी पावसामुळे अकोला आणि बुलढाण्यातील महायुतीच्या प्रचार सभांचं कसं नियोजन करण्यात आलंय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे..