Akola News : तरुणाने पवारांकडे मांडली लग्नाबाबत कैफियत, पत्र लिहिणारा लग्नाळू तरुण ABP Majha वर

Continues below advertisement

Akola News : तरुणाने पवारांकडे मांडली लग्नाबाबत कैफियत, पत्र लिहिणारा लग्नाळू तरुण ABP Majha वर 

'शरद पवारांना लग्नासाठी पत्र लिहिणाऱ्या तरुणाचं दुसरं पत्रही 'एबीपी माझा'च्या हाती. आमदार अमोल मिटकरींना मे महिन्यात लिहिलं होतं दत्तक घेण्यासाठी पत्र.

शरद पवारांना लग्नासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरुणांचं आणखी दुसरं पत्र 'एबीपी माझा'च्या हाती. याआधी या तरुणाने आमदार अमोल मिटकरी यांना लिहिलं होतं दत्तक घेण्याविषयी पत्र. तुम्ही आपल्याला दत्तक घेतलं तर आपण 'मिटकरी' नाव लावायला तयार असल्याचं तरुणांना मिटकरी यांना लिहिलेल्या पत्रात केला होता उल्लेख. तरुणाने अमोल मिटकरी यांना लिहिलेले पत्र 'एबीपी माझा'च्या हाती.

अकोल्यातील मंगेश इंगळे या तरुणाने शरद पवारांना आपल्या लग्नाच्या मध्यस्थीसाठी केली होती विनंती. संदर्भात 8 नोव्हेंबरला शरद पवार अकोला दौऱ्यावर असताना मंगेश इंगळेंनी शरद पवारांना दिलं होतं पत्र. शरद पवार म्हणतील त्या मुलीशी लग्न करण्यासाठी तयार असल्यास मंगेशने पत्रात केलं होतं नमूद. पत्र लिहिणारा मंगेश इंगळे सर्वात आधी 'एबीपी माझा च्या माध्यमातून आला होता महाराष्ट्र समोर.

दरम्यान, आपल्यालाही या तरुणाने पत्र लिहिल्याचा अमोल मिटकरी यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना केलं कबूल. मात्र असे अनेक पत्र येत असल्याने आपण त्या तरुणाची समजूत घालण्याचा प्रयत्न केल्याचा मिटकरी 'एबीपी माझा'शी बोलतांना म्हणाले. 'एबीपी माझा'शी बोलतांना मंगेश इंगळे यांनीही अमोल मिटकरींना पत्र पाठविल्याचा केला होता गौप्यस्फोट. मंगेश इंगळे यांनी मे महिन्यामध्ये अमोल मिटकरींना लिहिलेल्या पत्राविषयी अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola