Akola West Assembly Constituency मधील पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश

Continues below advertisement

अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द करण्याचे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिलेत.  न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती जवळकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिलेत. निवडणुकीविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. फक्त तीन महिन्याच्या कालावधीसाठी जनतेच्या पैशाचा अपव्यय का करता?, असा सवाल याचिकाकर्त्यांने निवडणूक आयोगाला केला होता. अकोल्यातील शिवमकुमार दुबे या नागरिकाने याचिका दाखल केली होती. 26 एप्रिलला अकोला पश्चिम पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार होतं. तर 4 जूनला निकाल लागणार होता. काँग्रेसकडून साजिदखान पठाण यांची उमेदवारी जाहीर झाली होती. भाजपकडून माजी महापौर विजय अग्रवाल आणि दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचा मुलगा कृष्णा शर्मा यांची नावं होती चर्चेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram