Akola Violence : Instagram वरील पोस्टमुळे अकोल्यात जाळपोळ, संपूर्ण राड्याची A टू Z कहाणी ABP Majha
Continues below advertisement
अकोला शहरातील जुने शहर भागातल्या हरिहरपेठमध्ये दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळलीय. या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आलीये. यात काही ठिकाणी दंगलखोरांनी आगीही लावल्याच्या घटना घडल्यायेत. या घटनेनंतर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिलेयेत. एका व्यक्तीच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमूळे ही दंगल भडकल्याचं बोललं जातंये. या व्यक्तीवर रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाये. या घटनेत दोन्ही गटातील 10 वर जखमी झालेयेत.
Continues below advertisement