Akola : अकोल्यात दोन गटांमध्ये राडा, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल; परिसरात तणापूर्व वातावरण
Continues below advertisement
अकोल्यातील राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी आणि फायर ब्रिगेडच्या दोन वाहनांची तोडफोड केली. तर काही ठिकाणी चारचाकी गाड्यांना आग लावण्याचाही प्रयत्न झाला. अकोल्यातील हरिहरपेठ भागातील राजराजेश्वर सेतू येथे शहरातील एका भागातून एक मोठा समूह चालून आला. या समूहानं संपुर्ण भागात दगडफेक आणि जाळपोळ करीत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीनं सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे ही दंगल भडकल्याचं बोललं जातंये. परिस्थिती सध्या नियंत्रणात असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
Continues below advertisement