Akola Seeds : अकोल्यातील धाडीत 62 नव्हे 45 लोक होती? , कृषी खात्याचं नेमकं चाललं काय? : ABP Majha
Continues below advertisement
अकोल्यातील बियाणं केंद्रांवरील धाडींबद्दल धक्कादायक बाब समोर आली आहे. .या धाडीत एकूण ६२ अधिकारी होते, असं खुद्द कृषीमंत्री सत्तार एबीपी माझाशी बोलताना म्हणाले होते. मात्र आज पुण्यातील कृषी आयुक्तालयात चौकशीसाठी केवळ ४५ अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे. अकोला पोलिसांनाही कृषी आयुक्तालयाकडून धाडीत ४५ लोक समाविष्ट असल्याची माहिती देण्यात आली आहे. मग हे उर्वरित १७ लोक कोण होते? हे १७ लोक कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांचे खाजगी लोक होते का? एकूणच काय तर कृषी खात्याकडून आज आलेल्या माहितीमुळे कृषीमंत्रीच पुन्हा तोंडघशी पडले आहेत.
Continues below advertisement