Akola मध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्यात MLA Nitin Deshmukh यांचे शिंदे गटावर गंभीर आरोप : ABP Majha

अकोला येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केलेत. आमदार नितीन देशमुखांनी सुरत आणि गुवाहाटीमधील अनेक गुढ उकलण्याचा इशारा शिंदे गटाला दिला आहे. या ठिकाणचे अनेक व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा त्यांनी गंभीर इशारा दिलाय.. शिंदे गटाबरोबर नितीन देशमुख देखील गुवाहाटीपर्यंत पोहोचले होते.. मात्र ते परतले आणि त्यांनी ठाकरेंना समर्थन जाहीर केलं... दरम्यान कालच्या मेळाव्यात नितीन देशमुखांनी
सतत शिवसेनेवर टीका करणाऱ्या नारायण राणेंचाही खरपूस समाचार घेतलाय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola