Akola Dangal Update : अकोल्यातल्या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ
अकोला शहरातील जुने शहर भागातल्या हरिहरपेठमध्ये दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली. यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर आठ जण गभीर जखमी आहेत.. दोन पोलीसही जखमी झालेत. पोलिसांनी २७ आरोपींना अटक केली आहे. तर १०० लोकांवर गुन्हे दाखल केलेत..तसंच इंस्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट केलेल्या आरोपीलाही अटक करण्यात आलीये या आरोपीचे एका राजकीय पक्षासोबत जवळचे संबंध असल्याचं समोर आलंय.. तसेच अकोला शहरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कोंबिंग ऑपरेशन राबवण्यास सुरू केला आहे... दरम्यान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचा आढावा घेतला आहे. सपूर्ण शहरात सध्या कलम १४४ लावण्यात आलं आहे. तसंच, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्याही अकोला शहरात दाखल झाल्या आहेत.. राज्य राखीव दलाचे अमरावती विभागाचे समादेशक राकेश कलासागर अकोल्यात तळ ठोकून आहेत. अकोलालगतच्या वाशिम, वर्धा, बुलढाणा आणि अमरावतीमधूनही अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. हरिहरपेठ परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. ..दंगल झालेल्या परिसराची गिरीश महाजनांकडून पाहणी