Akola Copy Case : बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी तरूण तोतया पोलीस बनून बारावी परीक्षा केंद्रावर
Continues below advertisement
Akola Copy Case : बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी तरूण तोतया पोलीस बनून बारावी परीक्षा केंद्रावर
बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. असं असलं तरी बारावीच्या पहिल्याच पेपरदरम्यान कॉपी पुरवण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा केद्रावर बहिणीला कॉपी देण्यासाठी तरुण चक्क तोतया पोलीस बनला. अकोला जिल्ह्यातील पातुर शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये परीक्षेदरम्यान काल हा प्रकार घडला. तरुण चक्क पोलिसांचा गणवेश धारण करून या केंद्रावर रुबाबाने कॉपी पुरवण्यासाठी आला, परंतु सॅल्यूट करतानाच त्याचं बिंग फुटल आणि हा प्रकार उघडकीस आला. अनुपम मदन खंडारे असं या तोतया पोलिसाचं नाव आहे.
Continues below advertisement