Sanjay Raut | अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला - संजय राऊत | ABP Majha

अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली. मुंबईत पत्रकार परिषद घेत राऊत यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. अजित पवारांना धमकावून फोडलं का असा सवाल राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. पैसा आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोपही राऊत यांनी केला. छत्रपतींच्या महाराष्ट्राला हा दगा अशोभनीय असल्याचं सांगत बंड करणाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा राऊत यांनी दिला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola