Aishwarya Aaradhya Bachchan to Home Quarantine | ऐश्वर्या, आराध्याला होम क्वॉरंटाईन करण्याची शक्यता
बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जया बच्चन यांची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. काल रात्री बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना आता होम क्वॉरंटाईन करण्याची शक्यता आहे.