Sujay Vikhe on Sheogaon Riots : शेवगावमध्ये दगडफेक, सुजय विखेंकडून व्यापाऱ्यांची भेट

Sujay Vikhe on Sheogaon Riots : शेवगावमध्ये दगडफेक, सुजय विखेंकडून व्यापाऱ्यांची भेट

अहमदनगरमधील शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवेळी दगडफेकीची घटना घडली होती.. त्या घटनेच्या निषेधार्थ शेवगावमधील व्यापाऱ्यांनी दगडफेक करणाऱ्यांवर कारवाईसाठी कालपासून बेमुदत बंद पुकारलाय... या बंदचा आजचा दुसरा दिवस असून बंदला व्यापाऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय.. जोपर्यंत समाजकंटकांना अटक होत नाही तोपर्यंत बंद सुरुच ठेवणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय.. भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यापाऱ्यांची भेट घेत बंदला पाठिंबा दिलाय... तर आज दुपारी पुन्हा व्यापारी आणि प्रशासनाची बैठक होणार असून या बैठकीत काय तोडगा निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola