Shirdi Saibaba Sansthan Trust : साई संस्थानात दीड महिन्यात तब्बल 47 कोटींचं दान
शिर्डीतील साई संस्थानात २५ एप्रिल ते १५ जून या काळात तब्बल ४७ कोटींचं दान करण्यात आलंय. यातील २६ कोटी रुपये दान देणगी कांऊटरवर करण्यात आले तर, दक्षिणापेटीत १० कोटी दान करण्यात आलेत. त्याचप्रमाणे, सव्वा कोटींचे सोने, २८ लाखांची चांदीही भाविकांनी अर्पण केलीय. महत्त्वाचं म्हणजे, सशुल्क आरती आणि सशुल्क दर्शन पासच्या माध्यमातून साई संस्थानकडे ११ कोटी रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, या काळात २२ लाख ४१ हजार भक्तांनी भोजन प्रसादाचाही लाभ घेतलाय.