Rohit Pawar : कर्जतमध्ये हल्ला झालेल्या तरुणाची रोहित पवारांनी घेतली भेट, भाजपवर टीका
अहमदनगरच्या कर्जतमध्ये हल्ल्यात जखमी झालेल्या प्रतीक पवार या तरुणाची राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रुग्णालयात भेट घेतली. या प्रकरणात कुणीही राजकारण करायला नको होतं, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिलीय. नुपूर शर्मा यांचा डीपी ठेवल्यानं प्रतिक पवार यांच्यावर हल्ला करण्यात आला, असा आरोप भाजपनं केला आहे. नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांनी या तरुणाची भेटही घेतली. भाजप नेत्यांनी वातावरण गढूळ केल्याचं सांगत पवार यांनी राणे आणि पडळकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं.