Murlidhar Mohol on Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरु होणार
Murlidhar Mohol on Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरु होणार
शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग उडान सुविधेतही समावेशाची मोहोळ यांची ग्वाही शिर्डी लोकमाईबाबा ने अतरराष्ट्रीय विमानतळावर आगामी पंधरा दिवसांतच नाईट लैंडिंग विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू होईल. तसेच या विमानतळावरून देशांतर्गत सेवा वाढवण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. सामान्य साईभक्तांना विमानसेवेचा लाभ घेता यावा, यासाठी शिर्डी एअरपोर्ट उडान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहळ यांनी केली. गुरुवारी सायंकाळी धुपारतीपूर्वी मोहळ यांनी साईदर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री मोहळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून शिर्डी एअरपोर्टबाबतच्या अडचणी सोडविण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार अमित शाह यांनी मागील आठवड्यातच शिर्डी एअरपोर्टसाठी सीआयएसएफचे मनुष्यबळ वाढवून देण्याचे निर्देश दिले आहेत. नाईट लँडिंगबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून पंधरा दिवसांत शिर्डीतून विमानांची नाईट लैंडिंग व टेकऑफ सुरू होईल. येत्या ६ तारखेला मुंबईत नागरी उड्डाण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुख्यमंत्री फडणवीस व आपल्या उपस्थितीत शिर्डीसह राज्यभरातील विमानतळाच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस निर्णय घेणार असल्याचे मोहळ यांनी जाहीर केले सोलापूर-मुंबई विमानसेवा लवकरच सध्या देशात सहाशे मार्ग 'उडान' अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यात शिर्डीचाही समावेश करता येईल. विठ्ठलाचे भक्त आणी तुळजापूरच्या भवानीमातेच्या भक्तांच्या सोयीसाठी सोलापूर-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही मोहळ यांनी सांगितले