Ahmednagar Lumpy: अहमदनगर जिल्ह्यात वाढतोय लम्पीचा प्रादुर्भाव
Ahmednagar Lumpy: अहमदनगर जिल्ह्यात वाढतोय लम्पीचा प्रादुर्भाव मागील वर्षी लसीकरणामुळे कमी झालेला जनावरांमधील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यात वाढू लागलाय... गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात 239 गावात 1 हजार 174 जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे... त्यातील 19 जनावरे गंभीर अवस्थेत असून 53 जनावरांचा मृत्यू झाला... राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव तालुक्यात लम्पीचे प्रमाण वाढते आहे. शेतकर्यांनी, पशुपालकांनी गोठे स्वच्छ ठेवून कीटकनाशकांची फवारणी करावी, पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरणाची मोहीम सुरू केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली...गेल्या मे 2023 मध्ये जिल्ह्यात केवळ 4 जनावरांना लागण झालेली आढळली होती...परंतु पावसाळा सुरू झाला तसा, 15 जूननंतर लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढता वाढू लागला आहे. पावसाळ्यात कीटक, चिलटे, डास माशांचे प्रमाण वाढू लागले तसे जनावरातील लम्पीचा आजार बळावत चालला...जिल्ह्यात 239 गावात लम्पीचा प्रादुर्भाव असून सर्वाधिक रुग्णसंख्या शेवगाव 279, राहुरी 269,कोपरगाव 183,पाथर्डीत 134 आहे