Dhangar Reservation : Eknath Shinde चौंडीतील उपोषणकर्त्यांना फोन, पाहा काय झाली चर्चा...
Continues below advertisement
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगरच्या चौंडीत सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या उपोषण आंदोलनाचा आजचा 21 वा दिवस आहे, दरम्यान उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे 15 जणांची विशेष वैद्यकीय टीम पाठवणार असल्याचे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हंटलंय. काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांशी फोनवरुन चर्चा करत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केलीये. दरम्यान आज मंत्री गिरीश महाजन हे चौंडीत उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाची पुढची दिशा काय ठरते हेही पाहणं महत्त्वाचं असणारेय.
Continues below advertisement