Shirdi Nilwande Dam : निळवंडे धरणाचा डावा कालवा पूर्ण, शिंदे-फडणवीसांच्या हस्ते सोडणार पाणी

Continues below advertisement

अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील 182 गावांसाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या मुख्य भिंतीचे काम 2011 साली पूर्ण झालं.. तर धरणाच्या डाव्या कालव्याचे कामदेखील पूर्ण झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी करण्यात येणार आहे. या डाव्या कालव्याची लांबी 85 किलोमीटर आहे..   नगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील 107 गावे आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील 6 अशी एकत्रित 113 गावांना याचा फायदा होणार आहे. तसंच उजव्या कालव्याचं कामही अंतिम टप्यात आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram