Shirdi Diwali 2022 : भाऊबीज आणि दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी
Shirdi Diwali 2022: भाऊबीज आणि दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी झालीय. साईबाबांच्या जयघोषाने साईनगरी दुमदुमून गेली आहे.. गेल्या २ वर्षात कोरोना निर्बंधामुळे शिर्डीत सगळे उत्सव साध्या पद्धतीने पार पडले होते. मात्र यावर्षी कोरोना निर्बंधांशिवाय मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा होतोय. दिवाळीच्या सुट्यांमध्ये देवदर्शनासाठी सुद्धा गर्दी होऊ लागली आहे.. अभिनेते, नेते यासह भाविकांची पावले साई दर्शनासाठी वळू लागली असून शिर्डीत भाविकांनी साईबाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय..