Ahmednagar Cooperative Bank : नगर जिल्हा प्राथमिक शिक्षण सहकारी बँकेच्या सभेत गोंधळ

Continues below advertisement

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकची 104 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली... अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दरवर्षी प्रमाणे अनेक विषयांवरून चांगलंच गोंधळ पाहायला मिळाला...विरोधकांनी सत्ताधारी पॅनलचे अध्यक्ष बोलत असताना थेट स्टेजवर प्रवेश करत माईक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.. या गोंधळामुळे अखेर पोलिसांना हस्तक्षेप करून गोंधळ थांबवा लागला...सभा सुरु झाल्यानंतर काही वेळातच 14 नंबरचा ठराव रद्द करण्याच्या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ सुरू केला होता... बँकेतील ठेवीतून प्रत्येक सभासदांच्या कायम ठेवीतून वीस हजार रुपये वळवून ते प्रगती मंडळाकडे वळविण्याचा हा विषय होता...ही रक्कम तब्बल वीस कोटींहून अधिक होत असूनही रक्कम वापरून एक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्याबाबत हा विषय चर्चेत ठेवण्यात आला होता... मात्र कोणत्याही सभासदांना विचारात न घेता हा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेत का घेतला यावरून सभेच्या सुरुवातीलाच गुरुजींमध्ये वाद सुरू झाल्याचा पाहायला मिळालं घोषणाबाजी आणि फलकबाजी देखील झाल्याचे पाहायला मिळालं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram