Ahmednagar Rain : अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील देवीभोयरे, वडझिरे भागात ढगफुटी सदृश्य पाऊस
Continues below advertisement
मागील पंधरा दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सूनने राज्यातील विविध भागात हजेरी लावली आहे... अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील देवीभोयरे, वडझिरे या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय.. पहिल्याच पावसात शेतात पाणी साचलं असून दोन्ही गावाच्या परिसरातील ओढून नाले भरून वाहू लागले आहेत.. नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय.. या जोरदार पावसामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला दिलासा मिळालाय.. खरिपाच्या पेरणीला उशीर झालेला असताना जोरदार पाऊस झाल्याने या भागातील शेतातील पेरण्या सुरू होणार आहेत....
Continues below advertisement