Rahata Ganesh Sugar Factory : थोरातांचा विखेंना धक्का! गणेश साखर कारखाना निवडणुकीत उडवळा धुरळा
abp majha web team
Updated at:
20 Jun 2023 11:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणेश सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने राहाता तालुक्यातील होमग्राऊंडवर विखे-पाटलांचा पराभव झालाय. गणेश सहकारी साखर कारखान्यात 19 पैकी 18 जागा बाळासाहेब थोरत आणि विवेक कोल्हे यांनी जिंकल्यात. या निकालानंतर शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली आणि यात अनेकांनी विखे-पाटलांवर टीकेची तोफ डागली. 8 वर्षांपासून सत्ता असलेल्या विखे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे यापुढे विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्ष आणखी तिव्र होणार हे नक्की.