Akole Marathi Medium Schools | मराठी शाळांसाठी सवलतींचा पाऊस,अकोल्यातील ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय

इंग्रजी शाळांच्या तुलनेत गेल्या काही वर्षात मराठी शाळांची गुणवत्ता देखील वाढली आहे.. माझी शाळा मराठी शाळा अशी जनजागृती देखील सुरू असताना आता गावकरी देखील यात मागे नाहीत.. गावातील जे पालक आपली मुल किंवा मुली जिल्हा परिषद शाळेत घालतील त्यांना नळपट्टी व घरपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा ठरावच आता ग्रामपंचायतने केलाय.. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत हा निर्णय घेत राज्यसमोर एक आदर्श उभा केला आहे...

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे गाव... याच गावाने  वर्षभरापूर्वी दुधाच्या भावासाठी राज्यव्यापी आंदोलन करत दूध उत्पादकांना दिलासा दिला होता.. दोन दिवसांपूर्वी गणोरे ग्रामपंचायतची ग्रामसभा संपन्न झाली.. या ग्रामसभेत विविध विषयांसह मराठीचा टक्का वाढवण्यासाठी एक अभिनव ठराव मंजूर करण्यात आला.. गावातील जिल्हा परिषद शाळेत जे पालक आपल्या मुलांना प्रवेश देतील त्या पालकांना घरपट्टी व नळपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा अभिनव निर्णय ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला... गणोरे गावात दोन जिल्हा परिषदेच्या शाळा असून या शाळांना आयएसओ मानांकन देखील मिळालेल आहे... मात्र इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत मराठीच्या शाळाही टिकाव्यात व पटसंख्या वाढविण्यसाठी ग्रामसभेत हा अभिनव निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला... या निर्णयाविषयी गावचे सरपंच संतोष आंब्रे यासह ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola