Ahmednagar Shevgaon : शेवगावमध्ये पाण्यासाठी महिलांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
Continues below advertisement
Ahmednagar Shevgaon : शेवगावमध्ये पाण्यासाठी महिलांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
अहमदनगरच्या शेवगाव इथल्या महिलांनी पाण्याच्या प्रश्नासाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. सध्या शेवगाव शहरात पंधरा ते वीस दिवसांनी पाणी येतं. त्यातही अशुद्ध आणि गढूळ पाणी येत असल्याने नागरिक हावालदिल झालेत. पालिका प्रशासनाला वारंवार विनंती करुनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त महिलांनी शहरातून मोर्चा काढत पाण्याच्या टाकीवर चढून जोरदार घोषणाबाजी केली. शेवगाव शहरात दिवसाआड स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी मिळावे अशी मागणी महिलांनी केली आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई केली नाही नाही तर भविष्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा महिला आंदोलकांनी दिला आहे.
Continues below advertisement