Ahmednagar Rahuri : राहुरीमध्ये तीन अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

Continues below advertisement

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातलं अल्पवयीन मुलींना धमकी दिल्याचं प्रकरण अधिक गंभीर होत चाललं आहे. उंबरे गावातील एका कोचिंग क्लासला जाणाऱ्या मुलींचे फोटो व्हायरल करू, अशी धमकी क्लासमधलेच काही विद्यार्थी देत होते, असा आरोप आहे. आतापर्यंत क्लासमधल्या तीन अल्पवयीन मुलींनी याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे. धक्कादायक म्हणजे कोचिंक क्लासमधील शिक्षिकेला देखील पोलिसांनी अटक केली आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे ही शिक्षिका विद्यार्थिनींना अतिशय आक्षेपार्ह सल्ले द्यायची. आमच्या धर्मातील मुलींसारख्या राहत जा, हातात बांगड्या घालू नका असं ती विद्यार्थिनींना म्हणायची. एवढंच नाही तर ब्लॅकमेल करणाऱ्या मुलांची ओळख शिक्षिकेनंच करून दिली होती, असाही आरोप पीडित मुलींनी केला आहे. एकूण ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यापैकी शिक्षिकेसह ४ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram