Ahmednagar अहमदनगर शहरातील हिंदू धर्मसभेत Kalicharan Maharaj सहभागी होणार

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराजांच्या उपस्थितीत आज अहमदनगर शहरात हिंदू धर्मसभा होणारे आहे...अहमदनगरचे  ह.भ.प राहुल महाराज दरंदले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे...आजच्या धर्मसभेत कालीचरण महाराज धर्मांतर, गोहत्या, लव्हजिहाद या विषयावर बोलणार आहेत...धर्मांतर मुद्द्यावर हिंदू समाजाने एकत्र येऊन होणारे धर्मांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करावे , वाढत्या गोहत्या थांबवाव्यात यासाठी हिंदू समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे राहुल महाराज दरंदले यांनी सांगितले आहे...नुकताच अहमदनगर शहरातील मिरावली पहाडावरील समाधीवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरही कालीचरण महाराज बोलण्याची शक्यता आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola