Ahmednagar Jawari Crop Issue : ज्वारीच्या पिकावर रोगांचं संकट, अहमदनगरच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली
अहमदनगरच्या जामखेड येथील खर्डा परिसराची ज्वारीचं माहेरघर अशी आहे. मात्र हवामानातील बदलांमुळे पीक हुरड्यात आलेलं असताना, चिकटा, मावा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. दरवर्षी हजारो क्विंटल ज्वारीचं उत्पादन देणाऱ्या खर्डा परिसरातील शेतकरी आता हवालदिल झालाय.