Ahmednagar Akole : 34 रुपये दराचा आदेश काढूनही दर नाही, अकोलेमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन
Ahmednagar Akole : 34 रुपये दराचा आदेश काढूनही दर नाही, अकोलेमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन
दुधाला ३४ रुपये दर देण्याचा आदेश काढूनही दूधसंघ दर देत नसल्याने आज राज्यभर सरकारच्या आदेशाची होळी केली जातेय. अहमदनगर जिल्ह्यासह २१ ठिकाणी आज आदेशाची होळी करण्यात आलीय. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात अकोले तालुक्यात आज आंदोलन करण्यात आलं. तर सांगलीत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आंदोलनत केलं. सरकारने दूध दरात वाढ करा अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल, अशा इशारा खोतांना दिला.