Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या वकिलांची बैठक
Continues below advertisement
मुंबई : सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, सोमवार 11 जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजता नवीन महाराष्ट्र सदनमध्ये होणाऱ्या या बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, अनिल परब यांच्यासह राज्य शासनाने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ, शासकीय तसेच खासगी याचिकाकर्त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Maratha Aarakshan Narendra Patil Sambhajiraje New Delhi State Government Maratha Reservation In Maharashtra Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Udayanraje Maratha Reservation