Delhi Gazipur Border | गाजीपूर बॉर्डरवर तणाव,आंदोलक शेतकऱ्यांना जागा रिकामी करण्याचे प्रशासनाचे आदेश
नवी दिल्ली : दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या गाजीपूर बॉर्डरवर तणावाची परिस्थिती कायम असून आता उत्तर प्रदेश सरकाने आंदोलनाची जागा करणाऱ्या शेतकऱ्यांना जागा खाली करण्याचे आदेश दिले. याच ठिकाणी गेल्या 60 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीनर गाजीपूर बॉर्डरवर पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. आदेशानंतर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. गाजियाबाद प्रशासनाशी बातचीत करणार नाही नसून या संदर्भात फक्त केंद्र सरकारशीचं चर्चा होईल.
Tags :
Gazipur Rakesh Dakait Indian Farmers Agriculture Bill Pass Farmer Protest Delhi Farmers New Delhi Delhi Agriculture Bill Maharashtra Farmers Farmer Protest