अभिनेता सोनू सूदचं घर, हॉटेल, कार्यालयात आयकर विभागाचा २० तास सर्व्हे

Continues below advertisement

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घर आणि कार्यालयाची जवळपास 20 तास आयकर विभागाकडून पाहणी करण्यात आली. बुधवारी पहाटे सहा वाजल्यापासून आयकर विभागाच्या 12 जणांचं पथक अभिनेता सोनू सूदच्या घरी दाखल झालं होतं. त्यानंतर सोनू सूद आणि कुटुंबियांचे फोन आयकर विभागाकडून बंद करण्यात आले होते. दरम्यान, घर आणि कार्यालयासह एकूण 6 जागी आयकर विभागानं पाहणी केली. 

आयकर विभागानं तब्बल 20 तास सोनू सूदच्या घराची पाहणी केली. सोनूचं मुंबईतील कार्यालय, हॉटेल आणि घरासह 6 ठिकाणांची आयकर विभागानं पाहणी केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे सहा वाजता पाहणी सुरु केली होती. मात्र, आयकर विभागानं ही कारवाई का केली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram