#Coronavirus क्वॉरंटाईन रुग्णांपैकी कुणी पळून गेल्यास कायदेशीर कडक कारवाई - दीपक म्हैसेकर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यात कोरोनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण पुण्यात असल्याची माहिती आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 17 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.